अहमदनगरमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा पार पडला. या मेळाव्यात सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्याच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट केला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आपण आधीच राजीनामा दिल्याचं म्हटलं. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भुजबळ यांनी केलेल्या राजीनाम्याच्या विधानाला त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चांशी संबंध जोडला जात आहे.
छगन भुजबळ यांच्या राजीनामा दिल्याच्या विधानावर अजित पवार गटाने आपली प्रतिक्रिया दिलीय. त्याचबरोबर इतर राजकीय नेत्यांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. राजीनामा दिला की नाही याबाबत छगन भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झालेले नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.
यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ साहेब काय बोलले, त्यांच्या काय भावना आहेत या निश्चितपणे आम्ही जाणून घेऊ आणि मगच त्यावर प्रतिक्रिया देऊ. अहमदनगरचे भाषण मी ऐकले नाही. मी त्यांच्याशी जरूर बोलेल, समजून घेईल आणि त्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया देईल असं तटकरे म्हणालेत.