राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भायखळा परिसरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही थरारक घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सचिन कुर्मी हे शुक्रवारी (ता. ४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात थांबले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन कुर्मी हे गंभीर जखमी झाले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा कुर्मी हे जखमी अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.