आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पु्न्हा आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची वेळ संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्याआधी आधीच सकल मराठा समाजाने नेत्यांना गावांमध्ये फिरकू न देण्याचा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सकल मराठा समाजाने माढा तालुक्यात प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे.येत्या 23 आक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे माढा तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत.
अजित पवारांच्या या कार्यक्रमाला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. या संदर्भात माढा पोलिसांना लेखी पत्र दिले आहे.
मराठा आरक्षण द्या, मगच तुमचे दौरे करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने पत्राद्वारे केली आहे. अजित पवार यांना येत्या २३ ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथील कारखान्यावरील दौऱ्याबाबत प्रवेश करण्यात येत आहे. तसे झाले नाही तर अजित पवार यांना सकल मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.