Monday, December 9, 2024

शरद पवारांना सोडणं ही माझी मोठी चूक; अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं?

अजित पवारांनी काका शरद पवारांचा हात सोडला अन् ते महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात फूट पडली. काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तर काहींनी त्यांचा कडाडून विरोध केला. पण या निर्णयाबद्दल स्वत: अजित पवारांना काय वाटतं? महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार यावर बोलते झाले. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होती. गडचिरोलीतील या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी यावर भाष्य केलंय.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles