Saturday, April 26, 2025

बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना थेट आव्हान,अजित पवारांनीच केलं जाहीर

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. अजित पवार गट बारामती लोकसभेची जागा लढणार असल्याचं खुद्द अजित पवार यांनी जाहीर केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट सुप्रिया सुळेंसमोर कडवं आव्हान उभं करणार हे स्पष्ट झालं आहे. कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विचारमंथन शिबिरात अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांनी शिबिरात नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारील लागण्याच्या देखील सूचना केल्या आहेत. यावेळी अजित पवार यांनी बारामती, मावळ, रायगड, सातारा या लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट निवडणूक लढवणार का? अशी चर्चा होती. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्याला ताकदीने काम करायचे आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं.

बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या चार जागा तर आपण लढवणारच आहोत. याशिवाय ठाकरे गटाच्याही काही जागा लढवणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळ जाहीर केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles