आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे. आज नाशिकमध्ये ही यात्रा होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी १७ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले तसेच ही योजना सुरू ठेवायची असल्यास आम्हाला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
“मी चांगली काम घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, ह्यावर आमच एकमत झालेले आहे, लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागला आहे, कंबर मोडायची वेळ आहे चूक झाली माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अब की बार ४०० पार मुळे देखील झटका लागला कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी करायची नाही,” असे म्हणत अजित पवार यांनी लोकसभेला कांदा निर्यातबंधीच्या निर्णयाचा फटका बसल्याची कबुली दिली.