राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शरद पवार गटाविरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अजित पवार यांनी नवी चाल खेळली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
तकंच नाही, तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार
गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांचा गट दोन महिन्यापासून सत्तेत सामील झाला आहे. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली
या ९ आमदारांना निलंबित करा, अशी मागणी देखील शरद पवार गटाकडून करण्यात आली. त्याचबरोबर अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांना शरद पवार गटाने अपात्रतेची नोटीस धाडली. दरम्यान, शरद पवार गटाच्या या कारवाईमुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे.