निलेश लंके काळा की गोरा हे शरद पवार यांना माहिती नसताना मी त्याला निधी दिला आणि तो आज तिकडे गेला अशी टीका अजित पवार यांनी केली होत. त्यावर निलेश लंके यांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं आहे. मी ते वक्तव्य ऐकलेलं नाही, एकदा माहिती घेतो आणि मग बोलतो असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगरमध्ये मंगळवारी केलेल्या भाषणावरून देखील त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भाषण केलं. कोणत्याही विकसित देशातील नागरिक हा तिथल्या विकासाबाबत चर्चा करत असतो. मात्र आपल्या देशात हिंदू मुस्लिम आणि जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.