Friday, March 28, 2025

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा दिल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे. मात्र, पक्षातील मनमानीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सध्या नंदुरबारमध्ये रंगली आहे.

राव मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे बंधू आहेत. त्यांची नंदुरबार जिल्ह्यात मोठी ताकद असून तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मोरे हे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार? याबाबत तर्क वितर्क सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. ५ पैकी केवळ एका जागेवरच पक्षाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत.लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही अजित पवार गटातून अनेक नेते तसेच पदाधिकारी बाहेर पडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून देखील पक्षांतर होण्याची सुरुवात होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles