अहमदनगर- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांची अहमदनगर येथुन पोलीस प्रशिक्षण केंद्, खंडाळा येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अजित त्रिपुटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी सध्या प्रशासकीय बदल्या होत असून लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्या आदेशाने ही बदली झालेली आहे.
अजित त्रिपुटे यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कार्यभार असे घेतला असून कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.