Tuesday, May 13, 2025

अनंत अंबानींचा शाही विवाह…रिलायन्स, जिओच्या कर्मचाऱ्यांना मिळाली खास भेटवस्तू…व्हिडिओ

मुकेश व नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज, १२ जुलैला शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधून अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. मुकेश व नीता अंबानींनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नानिमित्ताने रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांना खास भेटवस्तू दिली आहे.तान्या राज आणि फिरदौस मोहम्मद इरफान अन्सारी यांनी मुकेश व नीता अंबानींकडून मिळालेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत, अंबानींकडून कर्मचाऱ्यांना एक मोठा असा बॉक्स मिळाल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये चांदीचं नाणं, मिठाई, शेव, चिवड्याचं पाकिटं पाहायला मिळत आहे. तसंच चांदीच्या नाण्यावर अनंत-राधिकाच्या नावाचं पहिलं अक्षर ‘अR’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या रिलायन्स व जिओच्या कर्मचाऱ्यांकडून अंबानींचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles