Wednesday, June 25, 2025

गटविकास अधिकाऱ्याचे ग्रामसेविकेसोबत अश्लील चाळे, पीडित महिलेचं धक्कादायक पाऊल

अकोला जिल्ह्यातील अडगाव बुजरूकच्या ग्रामसेविका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अकोट तालूक्यातील पोपटखेड धरणात उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाआहे. काठावर उपस्थित लोकांनी या महिलेचे प्राण वाचवले आहेत. अत्यवस्थ ग्रामसेविका महिला यांच्यावर अकोटच्या तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपारार्थ अकोल्यात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आलं आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने अकोला जिल्हा परिषदेचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यासोबतच सध्या हिंगोली जिल्ह्यातील गटविकास अधिकारी लिंबाजी बारगिरे यांच्यावरही लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दोघांवरही अकोल्यातल्या रामदास पेठ पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, दोघांवरही पोलीस पुढील कारवाई करत नसल्याचा आरोप करत ग्रामसेविका महिला यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दरम्यान महिलेनं यापूर्वी देखील आरोप केलेले आहेत.

पीडित महिलेच्या आरोपानुसार बारगिरे हा अकोल्यात कार्यरत होता. तेव्हापासून तो ग्रामसेविकेचे शोषण करत आहे. तसेच तो मोबाइलवर अश्लील मॅसेज पाठवत होता. संबंधित ग्रामसेविकेची विभागीय चौकशी सुरु असून, चौकशी मॅनेज करून देतो, असे म्हणून तो शनिवारी अकोल्यात ग्रामसेविकेला त्याने दुपारी रेल्वेस्थानक चौकात बोलावले होते. तेथे आल्यावर त्याने लॉजमध्ये येण्याचा आग्रह केला. सुरुवातीला ग्रामसेविकेने नकार दिला असता नंतर दोघेही रेल्वेस्थानक येथील एका भोजनालयात जेवणासाठी गेले. ”लॉजवर जाऊ आणि तेथेच विभागीय चौकशी कशी मॅनेज करता येईल ते बघू असे”, म्हणून त्याने ग्रामसेविकेला लॉजवर येण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र, ग्रामसेविकेने प्रसंगावधान राखत ऑटोरिक्षात बसून मैत्रिणीकडे जाऊ असे म्हटले, ऑटोरिक्षामध्येही त्याने ग्रामसेविकेचा विनयभंग केला. अखेर पीडितेने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले आणि बारगिरे याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles