अकोला: राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे ही फक्त भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पगार खाण्यासाठीच बसली आहेत, येथे संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचा गंभीर आरोप राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. विखे पाटलांचा हा आरोप म्हणजे आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जातंय. राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीसाठी आले होते. समारोपाच्या भाषणात त्यांनी देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली.
राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कृषी विज्ञान केंद्रांच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली. या ठिकाणी संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचं ते म्हणाले.