Tuesday, May 28, 2024

प्रेमप्रकरणातून मुलीने आत्महत्या केल्याचा संशय, मारहाणीत दोन जण गंभीर जखमी नगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर-प्रतिनिधी अकोले शहरातील बाजारतळावर गुरुवारी (२५ एप्रिल) सायंकाळी सात वाजेच्या 5 सुमारास प्रेमप्रकरणातून दोन गटात लाकडी दांडके व चाकूने हाणामारी झाली. त्यात दोघे जखमी झाले असून, 5 एकाची प्रकृती चिंताजनक आहे. प्रदीप सुरेश वाघीरे (रा. शाहूनगर, ता.अकोले) असे त्यांचे नाव आहे.याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारच्या आठवडे बाजारात प्रदीप वाघीरे याने मसाल्याचे, तर भाऊ संदीप याने काजू-बदामाचे दुकान लावले होते.

बाजार संपल्यावर दुकान आवरण्यासाठी आकाश सुरेश वाघिरे तेथे आला. त्याच वेळेस तेथे आरोपी विजय चव्हाण, गणेश चव्हाण व गणेश लक्ष्या हाणामारीत माने हे दुचाकीवर तेथे आले. ‘तुमच्या रोहितसोबत प्रेमसंबंध असल्यामुळेच आमची मुलगी मृत झाली. त्यामुळे आम्ही तुम्हाला सोडणार नाही’ असे म्हणून त्यांनी प्रदीप वाघीरे यांना शिवीगाळ सुरू केली. नंतर विजय चव्हाण व गणेश चव्हाण यांनी लाकडी दांडक्यांनी आकाश व संदीप यांना- मारहाण केली. या मारहाणीत आरोपी गणेश माने यालाही गंभीर जखम झाली. प्रदीप याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी व इतरांनी गंभीर जखमी वाघीरे यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रथमोपचार करून त्याला संगमनेरला हलविण्यात आले. हल्लेखोर गणेश माने (रा. कल्याण)त दाघ जखमाहाही जखमी झाला असून, अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. याप्रकरणी आकाश वाघीरे याच्या फिर्यादीवरून विजय बबन चव्हाण, गणेश विजय चव्हाण व गणेश माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आरोपी गणेश माने यास अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींच्या नात्यातील एका मुलीसोबत रोहित वाघीरे याचे प्रेमसंबंध होते. त्यातून संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करीत चव्हाण कुटुंबीय वाघिरे यांना सतत दमदाटी करीत होते, असे आकाश वाघीरे याने फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles