नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार किरण लहामटे यांनी महायुतीत राष्ट्रवादीचे तिकीट मलाच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीत बंडखोरी झाली तर आनंदच होईल असा टोला देखील वैभव पिचड यांचं नाव न घेता लगावला. अजितदादांना सत्तेची नव्हे तर महाराष्ट्र राज्याला अजित दादांची गरज असं अजितदादांचं काम आहे. विकासाचा वादा म्हणजेच अजितदादा असं समर्थन आमदार लहामटे यांनी यावेळी केलं. तर अकोले विधानसभा मतदारसंघात घड्याळाचा उमेदवार मीच असेन आणि महायुतीत बंडखोरी झाली तर आनंदच होईल असा टोला देखील पिचड यांचं नाव न घेता लगावला.
नगर जिल्ह्यातील अजितदादांच्या आमदाराचे मोठे वक्तव्य…म्हणाले, महायुतीत बंडखोरी झाली तर आनंदच…
- Advertisement -