अनेक अभिनेत्रींनंतर आलिया भट्ट देखील ‘डीपफेक’च्या जाळ्यात अडकली आहे. आलिया हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. व्हिडीओमध्ये एका मुलीच्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट् हिच्या चेहऱ्याचा वापर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये आलिया भट्ट हिला नको त्या अवस्थेत दाखवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावर अनेक सेलिब्रिटींनी संताप देखील व्यक्त केला. एवढंच नाही तर, दिल्ली पोलिसांच्या हाती याप्रकरणी पुरावे सापडले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवाय गुन्हेगारांना अटक होईल अशी माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली होती.
- Advertisement -