नगर : चेतक इलेक्ट्रिक बाइक कंपनीने नगर जिल्ह्यामध्ये अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑल न्यू 2024 चेतक प्रीमियम आणि अर्बन बाईक ग्राहकांसाठी कामदा ऑटो रायडर्स शोरूम मध्ये दाखल झाली आहे. प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी इलेक्ट्रिक बाइक ही काळाची गरज बनली आहे, पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरामुळे वायु प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात चेतक प्रीमियम आणि अर्बन इलेक्ट्रिक गाडीचा वापर करावा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी केले,
अहमदनगर शहरातील कामदा ऑटो रायडर्स शोरूम मध्ये ऑल न्यू 2024 चेतक प्रीमियम आणि अर्बन इलेक्ट्रिकल बाईक दाखल झाली असून त्या बाईकचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे, यावेळी संचालक हर्ष बत्रा, दिनेश बत्रा, माजी महापौर अभिषेक कळमकर, प्रविण बत्रा, पुनित बत्रा, आदींसह नागरिक उपस्थित होते,
संचालक हर्ष बत्रा म्हणाले की मनमाड रोडवरील चेतक इलेक्ट्रिक बाइक शोरूममधील सुमारे २ हजार बाइक आत्तापर्यंत ग्राहकांनी खरेदी केल्या आहे, या चेतक कंपनीची नवी इलेक्ट्रिक बाइक ही स्टील बॉडी मध्ये असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, चेतक प्रीमियम बाइक मध्ये गाडी विविध कलर सह रिव्हर्स सिस्टीम देखील आहे, चेतक कंपनीची इलेक्ट्रिक बाइक ग्राहकांना प्रवास करताना नियंत्रित,आरामदायी, सुरक्षित वाटते, याच बरोबर इंधन आणि आर्थिक बचत होत असल्याने ग्राहक इलेक्ट्रिक बाइकला पसंती देत आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने चेतक कंपनीच्या इलेक्ट्रिक बाइक खरेदी कराव्या असे आवाहन त्यांनी केले.
अहमदनगरमध्ये ऑल न्यू 2024 चेतक प्रीमियम आणि अर्बन इलेक्ट्रिकल बाईक दाखल
- Advertisement -