Sunday, December 8, 2024

अजित पवारांशी केलेली युती भाजपला धक्का;आरएसएसच्या मुखपत्रातून जोरदार हल्लाबोल..राज्यात बहुमत असताना.

देशभरात नुसत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. ४०० पार चा दावा करणाऱ्या एनडीए सरकारला ३०० देखील पार करता आला नाही. लोसकभेत महाराष्ट्रातही महायुतीला या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. दरम्यान शिवसेना भाजप यांच्यासोबत अजित पवार यांना घेतल्याचा काही फायदा न झाल्याचं लोकसभेचं चित्र आहे. राष्ट्रवादीचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यावरून आरएसएसच्या मुखपत्रातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असल्याचं मुखपत्रातून म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना(शिंदे गट) यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतलं असा प्रश्न या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. संघाला दहशतवादी संघटना असं म्हणणाऱ्या नेत्याला भाजपात प्रवेश दिल्याने संघ स्वंयसेवकांची मन दुखावली आहेत, असंही त्यामध्ये लिहण्यात आलं आहे.

दहशतवादाला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या आणि हिंदूंचा छळ करणाऱ्या, २६/११ ला RSS की साझीश म्हणणाऱ्या आणि RSS ला दहशतवादी संघटना म्हणून नावाजलेल्या काँग्रेसजनांना भाजपचे नेते बनवण्यात आले, त्यांनी चूक केली किंवा झाल्याची खेदाची नोंदही केली नाही. की त्यांना त्यांच्या मालकांनी खोटे बोलण्यास भाग पाडले. यामुळे आरएसएसच्या स्वंयसेवकांची मन प्रचंड दुखावली आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles