अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. “जास्त उडउड करू नको, तुलाही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकेल,नाही तर उडवून टाकेल’ अशी चिठ्ठी सापडली आहे. प्रहार जन शक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना उघडपणे धमकी देण्यात आली आहे.नेहरू मैदानात अज्ञात इसमा कडून गर्दीत ही चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही चिठ्ठी कुणी आणि का लिहिली याबद्दल अजून माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मैदानातील सीसीटीव्ही फुटेजः च्या आधारे तपास सुरू आहे.