Monday, April 22, 2024

महायुतीत जुंपली…. नवनीत राणा यांचे डिपॉझीट जप्त करू, प्रहारचा इशारा…

भाजप अंतर्गत विरोध डावलुन त्याच बरोबर राज्यातील महायुतीच्या नेत्यांना विश्वासात न घेता अमरावती येथे भाजपने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी आता डोकेदुखी ठरत आहे. नवनीत राणा यांचे डिपाॅझिट जप्त करण्याची तयारी प्रहारची असल्याची घोषणाच प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी केली.

अमरावती विषयी महायुती चर्चा होणार नाही. महाराष्ट्रातील इतर जागांबाबत आम्ही चर्चा करु असे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडे अमरावती लोकसभा मतदार संघात दोन विधानसभा मतदार संघ आहे. तर प्रहारने शिवसैनिक दिनेश बूब यांना उमेदवारी देत या ठिकाणी तिरंगी लढत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

नवनीत राणा भाजपमध्ये आहे तर रवि राणा कुठे आहे असा उपरोधिक प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला. भाजप युवा स्वाभिमान होण्याची भिती बच्चू कडू यांनी व्यक्त केली. इतक्या दूर तीर सुटला आहे आता तो मागे येणार नाही निशाणा लागल्यावरच तो तीर मागे येईल. दोन लाखांच्या मतांनी पराभूत करु वेळप्रसंगी नवनीत राणा यांचे डिपाॅझिट जप्त करु असा इशाराच बच्चू कडू यांनी आज दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles