केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांची एका कार्यक्रमात तोंडभरून स्तुती केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.पवार यांनी कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात जे भरीव काम केले, त्याला तोड नाही. पवारांच्या पुढाकारातून पश्चिम महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडली. त्यातून विदर्भातील कृषी क्षेत्राने धडा घेत दुग्ध व कृषीपूरक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा.”, असे आवाहन गडकरी यांनी केले.
तसेच पंजाबरावांचे नाव मोठे आहे आणि शरद पवारांचेही नाव मोठे आहे. त्यामुळे पंजाबरावांच्या नावाने पवारांना मिळालेला पुरस्कार आनंदायी आहे असे गडकरी म्हणाले.अमरावती येथे बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा यावेळी गडकरींच्या हस्ते पाच लक्ष रुपये, शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.