तुम्ही म्हणाल एवढे मौल्यवान दागिने पिठाच्या डब्यात कोण ठेवत. पण हा जुगाड पाहून तुम्हीही आता घराबाहेर जाताना हेच कराल. तसेच दागीणे स्वच्छ करण्याचंही तुमचं टेन्शन कायमचं जाईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,एका भांड्यात थोडं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात सोन्याचे दागिने टाकले आहेत. पीठ पूर्ण त्या दागिन्यांमध्ये बसतं. त्यानंतर महिला एक टूथपिक घेते आणि त्याने दागिन्यांमध्ये अडकलेलं पीठ काढते. आता याचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्ही पाहिलं असेल दागिने वापरून वापरून त्यातील काही कोपरे काळे पडलेले दिसतात. त्यात मळ, घाण साचते. साधा कपडा किंवा नुसत्या पाण्याने धुवून ही मळ निघत नाही. पण या पद्धतीने ती सहज निघेल असं ही गृहीणी सांगत आहे. @Kiranssmarttipsandtricksयुट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
- Advertisement -