सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच हसू आवरत नाही. असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. एक आजोबा गेटमधून जात आहेत. आता तुम्ही म्हणाला यात काय विशेष? पण अहो, जर तुम्ही हा व्हिडीओ एकदा पाहिलात तर तुमच्या तुमच्या पोटात सुद्धा हसून हसून गोळा येईल. तुम्ही देखील हेच म्हणाल, कोन है ये लोग कहा से आते है?
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका आजोबा घरातून बाहेर पडले आहेत. दरम्यान चालता चालता ते गेटपाशी येऊन उभे राहिले. पण गंमतीशीर बाब म्हणजे दरवाजा उघडलेला आहे. पण तरी देखील हे आजोबा त्या मोठ्या दरवाज्यामधील लहान दरवाजा उघडून त्यामधून जाताना दिसत आहेत. आता त्यांनी हा प्रकार का केला हे तर देवच जाणो, पण हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना मात्र हसू आवरत नाहिये.