शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते अंबादास दानवे यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या दानवे यांना आता शिवसेना नेतेपदावर बढती मिळाली आहे.
अंबादास दानवे यांची संघटनात्मक पकड, पक्षाने दिलेले कार्यक्रम तडीस नेण्याची हातोटी आणि लक्षवेधी आंदोलने पाहता ते शिवसेनेच्या पहिल्या फळीत जाऊन बसले आहेत.
चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेने सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी देत त्यांचा सन्मान केला आहे. आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगत खैरे यांनीही यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संभाजीनगर जिल्ह्यात अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची पुढची वाटचाल होणार हे स्पष्ट आहे.