Thursday, July 25, 2024

अंबानींच्या घरातील लग्न सोहळ्यात तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांनी केले ट्रोल..व्हिडिओ

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आनंद अंबानी याच्या लग्न सोहळ्याची गेल्या कित्येक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. या लग्नसोहळ्यापूर्वीचे विधी त्यांच्या मुंबईतील घरी पार पडत आहेत. तर काही दिवसांपूर्वी बी. के .सी इथल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इथं संगीतसोहळा पार पडला. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसंच तेजस ठाकरे यांनी या सोहळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तर तेजस यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियार चर्चेत आले आहेत.या डान्स व्हिडिओत एका व्यक्तीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे या सगळ्यांसोबत डान्स करताना दिसत आहेत. ये लड़की, हाए, अल्लाह (हाए-हाए, रे, अल्लाह)’ या गाण्यावर डान्स करताना हे यंग सेलिब्रिटी दिसत आहेत. सोबतच तेजस ठाकरेही मागे डान्स करताना या व्हायरल व्हिडिओत दिसत आहेत. शांत स्वभावाच्या तेजस यांचा हा डान्स व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. तर विरोधकांनी यावर टीका केली आहे.https://x.com/meNeeleshNRane/status/1810524235212726300

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles