सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही
नगर : अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू केले असून आज आठव्या दिवशी उपोषण करते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावली असून कर्मचाऱ्यांनी महापालिकेत निदर्शने केली, यावेळी साफसफाई व आरोग्य सुविधाचे काम बंद ठेवण्यात आले होते, शासनाने अजून पर्यंत निर्णय घेतला नाही त्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे, आज संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून गंभीर बनत चालले आहे, आम्ही लोकशाही मार्गाने आमचा हक्क मागत आहोत, या आंदोलनामध्ये काही अनुचित घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल , आता आम्ही सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा सचिव आनंद वायकर आणि अनंत लोखंडे यांनी दिला. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते