Monday, December 9, 2024

मनपा सफाई कामगारांच्या वारसांना मिळाला न्याय, खा.निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर यांची मध्यस्थी

सफाई कामगारांच्या वारसांना मिळाला न्याय, खा.निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर यांची मध्यस्थी
नगर: महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना न्यायालयीन निर्णय व शासन आदेशानुसार नियुक्ती आदेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील इतर अनेक महानगरपालिकांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली असताना अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाकडून चालढकल सुरू होती. या पार्श्वभूमीवर खा. निलेश लंके यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त मुंडे तसेच आस्थापना विभाग प्रमुखांशी चर्चा करून पात्र वारसांना नियुक्ती पत्र देण्याची मागणी केली तसेच नियुक्ती पत्रावर अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या. सोमवार दि. २ संप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व पात्र वारसांना नियुक्ती दिली जाणार आहे.

मनपाच्या आरोग्य विभागातील सफाई कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नियुक्त्यांचा प्रश्न खा. निलेश लंके यांनी काही तासांतच मार्गी लावल्याने कर्मचारी आनंदीत झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, कर्मचारी कृती समितीचे गुलाब गाडे, शरद भालेराव, बाळासाहेब उमाप, संजय साठे, लखन गाडे, संभाजी जावळे आदींसह सफाई कामगार व वारस उपस्थित होते.

अभिषेक कळमकर म्हणाले, कोणत्याही शहराचे गावाचे आरोग्य चांगले ठेवण्यात सफाई कामगारांचा सिंहांचा वाटा असतो. अपुऱ्या सोयी सुविधा असूनही सफाई कामगार आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतात. खरे तर समाजातील स्वच्छता दूत आहेत. लाड पागे समितीच्या शिफारशींचा लाभ सफाई कामगारांना दिला जात नव्हता. शासन निर्णय, न्यायालयाचा निकाल असतानाही वारसा हक्काने नियुक्ती दिली जात नव्हती. राज्यातील इतर महानगरपालिकांनी शासन आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र नगर महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली होती. या पार्श्वभूमीवर खा. निलेश लंके यांच्या माध्यमातून मनपा प्रशासनास नियुक्ती आदेश देण्याचे काम सुरू केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात यश आले याचा आनंद आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles