Saturday, May 25, 2024

मनपा कामगार युनियनचे प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांनी स्विकारला पदभार

अहमदनगर मनपा कामगार युनियनचे प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांनी स्विकारला पदभार

मनपा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावू -आनंद वायकर

नगर : संघटना ही मनपा कर्मचाऱ्यांची असून ती कामगार चळवळ आहे, या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असतात, आपली संघटना एकसंघ आहे, माजी अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी राजीनामा दिला असून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेत प्रभारी अध्यक्ष म्हणून जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांची निवड केली आहे आज त्यांनी पदभार स्वीकारत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरु केले आहे, कुठलेही प्रश्न प्रलंबित राहणार नसून युनियन नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुख दुखात सहभागी राहील, मनपा कर्मचाऱ्यांचा ७ वा वेतन आयोगाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून आचारसंहिता संपल्यानंतर तोही मार्गी लागेल, लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नोकरीचा प्रश्न न्याय प्रविष्ठ असून तिथे देखील आपल्याला न्याय मिळेल, दोन्ही प्रभारी अध्यक्ष आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असे प्रतिपादन जनरल सेक्रेटरी आनंद वायकर यांनी केले.
अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झालेले जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी जनरल सेक्रेटरी आनंद वायकर. माजी अध्यक्ष अनंत लोखंडे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, महादेव कोतकर, उपाध्यक्ष प्रकाश साठे, आयुब शेख, विजय कोतकर, सूर्यभान देवघडे. अंतवन क्षेत्रे, आकील सय्यद,सागर साळुंखे, अमोल लहारे, बाळासाहेब व्यापारी, अजित तारू, सखाराम पवार, बाबासाहेब राशिनकर, राजेंद्र वाघमारे, बैजू साठे, प्रफुल्ल लोंढे, अजय सौदे आधी उपस्थित होते.
सर्वांना सोबत घेवून मनपा कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावू असे मनोगत अहमदनगर मनपा कामगार युनियनचे नूतन प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles