Saturday, October 12, 2024

राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेरनिवड

पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलवून टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविणार -खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ओबीसी विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अमित खामकर यांची फेर निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगर येथील ओबीसी विभागाच्या विचार मंथन शिबिरात खामकर यांना दिले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, आमदार सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.
अमित खामकर यांनी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून विविध सामाजिक, शैक्षणिक कामातून वेगळा ठसा उमटवला आहे. समाजातील गोरगरीब, गरजू तसेच अडीअडचणीच्या वेळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून खामकर यांची ओळख आहे. तरुणाईचे मोठे संघटन त्यांनी उभे केले आहे. खामकर यांच्या या जमेच्या बाजू आहेत. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांची काम करण्याची वेगळी हातोटी आहे. या त्यांच्या अष्टपैलू कामाची दखल घेत व फुले, शाहू, आंबडेकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते खामकर यांची ओबीसी विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे व शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहील, अशी प्रतिक्रिया अमित खामकर यांनी निवडीनंतर दिली.

अजितदादांचा विश्‍वास सार्थ ठरवणार
पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलवून टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविणार आहे. जिथे जिथे माझी गरज पक्षाला पडेल त्या त्यावेळी मी उपलब्ध राहील. समाजाला न्याय मिळेल, असे काम करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विश्‍वास सार्थ ठरवेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles