पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार टप्प्यांत 270 जागांचा टप्पा ओलांडला आहे, हे डायरीत लिहून ठेवा, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. आज बिहारमध्ये एका सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीवर हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले आहेत की, ”लालूजींच्या पक्षाला (आरजेडी) चार जागाही मिळणार नाहीत आणि राहुल गांधी चाळीस जागाही मिळणार नाहीत. शहा म्हणाले की, इंडिया आघाडीचा सुपडा साफ होणार आहे. यादरम्यान शहा यांनी बिहारमधील पूर्व चंपारण लोकसभा मतदारसंघातून एनडीए समर्थित भाजप उमेदवार संजय जयस्वाल यांना विजयी करण्याचे आवाहन केले.