Saturday, March 15, 2025

शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले; हा खेळ ज्यांनी सुरु केला त्यांनीच तो संपवावा

मुंबई : एनडीएनं शेवटच्या टप्प्याआधीच बहुमताचा टप्पा गाठलाय असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलीय. अमित शाहांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली, त्यात त्यांनी हा दावा केला. विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेनं घ्यावा असं शाह म्हणाले. अखेरचा टप्पा पार होण्याआधीच एनडीएने 300 जागांचा आकडा गाठल्याचं ते म्हणाले. राज्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे, आणि युतीत सर्वकाही आलबेल आहे असं ते म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

घड्याळाचे काटे उलटे फिरवून 2019 ची परिस्थिती पु्न्हा आणणे शक्य असते तर तुम्ही महाराष्ट्रात वेगळ्याप्रकारे गोष्टी केल्या असत्या का, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. यावर अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. यावर अमित शाह म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्याकडून तोडले. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. ते आमचे मित्र होते, आम्ही निवडणूक एकत्रपणे युतीत लढवली होती. ज्याने हे सगळं सुरु केलं त्यानेच हे संपवलं पाहिजे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles