“विरोधक भ्रष्टाचारची बात करत आहेत. देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोट पे सांगत आहे. आमच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताय?”, असा घणाघात अमित शाह यांनी केला.
“पण यावेळी शरद पवारजी माझा कार्यकर्ता हुशार झाला आहे. त्याला तुमच्या खोट्या प्रचाराची जाणीव झाली आहे. आता तुमचा खोटा प्रचार चालणार नाही. घरोघरी जावून या खोट्या प्रचाराचा पर्दाफाश करायचा आहे. हे खोटं बोलणार आणि भ्रम निर्माण करतील. प्रत्येक कार्यकर्ता हा कमळसाठी समर्पित व्हावा. प्रत्येक कार्यकर्त्याने कमळला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी”, अशा सूचना अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.
‘औरंगजेब फॅन क्लब भारताची सुरक्षा सुनिश्चित करू शकत नाही. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते उद्धव ठाकरे आहेत. ते कसाबशी संबंधित असलेल्या लोकांसोबत एका ताटात जेवतात, ते पीएफआयला पाठिंबा देत असून औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या विरोधात उभे आहेत आहे. हा फॅन क्लब महाराष्ट्र आणि भारत सुरक्षित करू शकत नाही. केवळ भाजपच सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करू शकतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. आज पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र अधिवेशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केली आहे.