अहमदनगर :निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी शेवटच्या दिवशी ४ मार्चला हे महानाट्य संपल्यानंतर महानाट्यातील प्रमुख भूमिका करणारे अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जनतेशी संवाद साधला. नाटकाचं आयोजन १ मार्च ते ४ मार्चपर्यंत करण्यात आले होते.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की “लोकनेते माझे जवळचे मित्र ज्यांच्या समाजिक कार्याचा मला नेहमी अभिमान वाटतो. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील मानसं जनतेच्या काळजावर अधिराज्य गाजवतात त्यावेळी अभिमान वाटतो. नगरकरांचे मनापासून आभार उदंड प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो. लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो कारण तुम्ही लाखोंच्या गर्दीच नियोजन केलं, असं अमोल कोल्हे म्हणाले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे लढतायत. लोकनेत्यांना वाढदिवसाला गिफ्ट द्याच असतं पण मी मागतोय, लोकनेते यांनी लवकर निर्णय घ्यावा. महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्ता समोर झुकत नाही. दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून जर संसेदेत आला. सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीत घुमेल, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिण नगर मध्ये वाजली पाहिजे , असं म्हणत लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवा, अमोल कोल्हेंची लंकेंना साद
- Advertisement -