Wednesday, April 17, 2024

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट,लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?

अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मला मागच्या निवडणुकीत (लोकसभा २०१९) शरद पवार यांनी संधी दिली. मी त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. माझी संसदेतील कामगिरी आणि त्या कामगिरीचा लेखाजोखा सर्वत्र उपलब्ध आहे. तो तुम्ही पाहू शकता. तसेच मी तुम्हाला ठामपणे सांगतो की मी जी भूमिका घेतली आहे त्यावर ठाम आहे आणि पुढेही त्या भूमिकेवर ठाम राहीन. शिरूर मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कटीबद्ध राहीन.
खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल, वेगवेगळे आरोप करत असाल तर मी नम्रपणे तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप पाठवण्याचं कारण काय? लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय?

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles