शरद पवार यांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढलं पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. तुमच्यासाठी पवार साहेबांनी काय नाही केलं असा प्रश्नही विचारला. ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो असं म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?
दिल्लीच्या तक्ता समोर जुकायचं नसतं. हा स्वाभिमान रायगडच्या पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेक सोहळा घेवून दाखवला आणि डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर दाखवला . उत्तरेत जरी श्री राम असला तरी महाराष्ट्रामध्ये पंढरपुरचा जय श्री विठ्ठल आहे. शरद पवार यांना काय केलं असा प्रश्न विचारला जातो. त्याच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवार साहेबांनी काय नाही केले.
अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटलांवर टीका करताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, जुन्नर आंबेगावचे लोक फक्त पुजाऱ्यालाच नमस्कार करायचे. आता याच पुजाऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवायला जनता तयार झाली आहे . दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे हे नेते आहेत. ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो. वतनदारी वाचवण्यासाठी त्या वेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते. महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्येवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होते, तेव्हा अंध फक्त तयार होतात. पक्ष फोडून चाणिक्य होता येत नाही तर स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा करणारे खरे चाणक्य आहेत.