मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम राहू. मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून मग 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी म्हटलं. अमरावतीमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे. काम,पद, हे तर येत राहिल. पण विश्वास जर का गेला तर तो परत येत नाही. आम्ही सामान्यांसाठी लढू शकतो, मरु शकतो पण चापलुसी करु शकत नाही. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हाला अजित दादा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच लेनदेन नाही, असं बच्चू कडू म्हणाले.