Wednesday, April 17, 2024

जागावाटपाचा तिढा, प्रहार जनशक्ती महायुतीतून बाहेर पडणार! उमेदवाराची घोषणा करणार

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशात प्रहार जनशक्ती महायुतीत बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अमरावतीमधील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झालाय. प्रहार संघटना ६ एप्रिलला आपला उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा इच्छुक आहेत.

अमरावतीच्या जागेसाठी महायुतीमध्ये कलह निर्माण झालाय. या जागेवरून खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढायची आहे. तीच इच्छा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय. यामुळे मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता वाढताना जास्त दिसतोय.

नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नसल्याचं, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय, असं वाटतंय”, असंही बच्चू कडू यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हणाले होते. आता थेट उमेदवार घोषित करणार आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles