Wednesday, February 12, 2025

मोदींनी ज्यांना लहान भाऊ म्हटले, तोच नेता म्हणतोय…भाजप महागद्दार पक्ष

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस गद्दार असेल तर भाजप महागद्दार आहे, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत जानकर यांचा उल्लेख लहान भाऊ केला. भाजपच्याच पाठिंब्यावर त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आता जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला मतदान करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. ते अमरावती येथे आयोजित केलेल्या ‘वाडा’ आंदोलनात बोलत होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी ‘वाडा आंदोलन’ सुरू करण्यात आले.

महादेव जानकर म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेला काय झालं? मी आणि बच्चू कडू स्वतंत्र लढलो. त्या बच्चू कडूलाही पाडलं आणि मलाही खासदारकीला पाडलं. मी जर खासदार झालो असतो तर दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते. शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांना माझी विनंती आहे की, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहेच, पण भाजप महागद्दार आहे, असा घणाघात महादेव जानकर यांनी केलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles