उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत अमृता फडणवीस आपल्या गाण्याचं कौशल्य कायम जपताना दिसतात. नुकतंच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता फडणवीस यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांचं नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘सावन’ असं गाण्याचं नावं असून त्यांनी स्वतः गायलं आहे. “इस बार तेरे शहर में , जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं”, अशा अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याच्या ओळी आहेत.
- Advertisement -