Saturday, March 2, 2024

अमृता फडणवीस यांचे मंदिर स्वच्छता अभियान…व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केले ट्रोल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नाशिक मधील काळाराम मंदिरात मोदी स्वच्छता करतानाचा एक फोटो या दौऱ्यातील लक्षवेधी क्षणांपैकी एक ठरला. पंतप्रधान मोदींनी स्वच्छता करतानाच भारतवासीयांना मंदिरांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे सुद्धा आवाहन केले होते.अमृता फडणवीस यांनी त्यांची लेक दिविजा फडणवीस हिच्यासह अलीकडेच मुंबईतील प्राचीन राम मंदिराला भेट दिली. या भेटीच्या वेळी लेकीसह हातात झाडू व मॉब घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने स्वच्छता मोहीम आरंभली होती. तसेच मंदिरातील खांबांना रंगकाम करताना सुद्धा अमृता फडणवीस व दिविजा दिसत आहेत. याचाच एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना काहींनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी ‘स्वच्छ जागेची स्वच्छता करण्यात काय मोठेपणा’ असे म्हणत उलटप्रश्न केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles