धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर देवेंद्र फडणवीस तरळतात. कारण ते समोर असले तरी त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही, मस्ती करता येत नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सन मराठी वाहिनीवरील ‘होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा’ या शोसाठी घेतलेल्या मुलाखतीत अमृता बोलत होत्या. वेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? या प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. ‘आधी होते का?’ असा प्रतिप्रश्न सोनाली कुलकर्णीने केला असता, ‘कधीच नव्हते’ असंही त्या पुढे म्हणाल्या. ‘लग्नाच्या आधी पण नाही नंतर पण नाही?’ असं सोनालीने पुन्हा खोदून विचारलं. ते खूप प्रॅक्टिकल आहेत. मी रोमँटिक आहे. त्यांना रोमान्स तेवढा जमतही नाही आणि कळत नाही. त्यांना आता राजकारण सोडून काही कळत नाही, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांना रोमान्स तेवढा जमतही नाही आणि कळत नाही… अमृता फडणवीस यांचे वक्तव्य…
- Advertisement -