उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचं नाव “तुम्हें आईने की जरुरत नहीं” असं आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
अमृता फडणवीसांचे नवे गाणे
“तुम्हें आईने की जरुरत नहीं” हे अमृता फडणवीसांचे नवे गाणे रिलीज झाले आहे. शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच अमृता फडणवीस यांच्यासोबतच मिट ब्रोज आणि पियुष मेहरोलिया यांनी देखील हे गाणं गायलं आहे.मिट ब्रोज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तसेच नीलोत्पल बोरा आणि पियुष मेहरोलिया हे या गाण्याचे म्युझिक प्रोड्युसर आहेत. हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आलं आहे. गाण्याला आतापर्यंत जवळपास 2,536 व्ह्यूज मिळाले आहेत.
अमृता फडणीवस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन “तुम्हें आईने की जरुरत नहीं” या त्यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं,”Breezy and blissful “तुम्हें आईने की जरुरत नहीं” गाणं रिलीज झाले आहे.”