Monday, December 4, 2023

अहमदनगर जिल्ह्यात खळबळ…. शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

शाळा सुटल्यानंतर घरी चाललेल्या ११ वर्षीय मुलाचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. परंतु या घटनेने बेलापूरमध्ये खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेलापूर खुर्द येथे सायकलवरून शाळेत येणाऱ्या पियांशु अमोल शेलार या ११ वर्षीय सहावीच्या शाळकरी मुलाला तिघांनी मिळून अपहरणाचा प्रयत्न केला. ते तिघेही मोटार सायकलवरून बेलापूर येथुन राहुरीच्या दिशेने चालले होते. त्याच वेळी हा मुलगा नर्सरी कडून सायकलवर केशव गोविंद विद्यालयात बेलापूर खुर्द येथे नेहमीप्रमाणे शाळेत येत होता. त्याच्या जवळून पुढे गेल्यावर तो एकटाच आहे हे पाहून त्या तिघांनी पुन्हा मागे येऊन त्या मुलाला हात ओढुन त्याला एक फटका मारला आणि गाडीवर बसण्यासाठी दमबाजी करीत आपल्या गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलाने त्यांच्या हाताला हिसका देत आरडाओरड करुन पळ काढला. तेवढ्यात रविंद्र पुजारी यांनी त्या मुलाला रस्त्याच्या बाजूला रडताना पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान त्या तिघांनी देवळालीच्या दिशेने पलायन केले आहे. या संदर्भात बेलापूर खुर्दचे प्रभारी सरपंच अँड.दिपक बारहाते, शिक्षक प्रशांत होन यांच्या पुढाकाराने पालकांनी स्थानिक पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम तात्काळ सुरु केले आहे.. या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असुन विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पालकांनी सतर्क राहुन आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी असे आवाहन अँड. दिपक बारहाते यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: