Wednesday, April 17, 2024

सोशल मिडियावर शेअर ट्रेडिंग ग्रुप मध्ये अँड झाले, अहमदनगरमधील माजी सैनिकाने 32 लाख गमावले

अहमदनगर: शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत माजी सैनिकाची ३२ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना डिसेंबर ते मार्च दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरजकुमार नागेश्वर ठाकूर (वय ३९, रा. विजय लाइन चौक, भिंगार) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांना सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंग कसे करावे व त्यातून नफा कसा मिळवावा, याबाबतची जाहिरात दिसली. त्यांनी त्यावर क्लिक केले असता, ते ग्रुपला जॉइन झाले.

‘तुम्ही आम्ही सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला नफा मिळेल,’ असे त्यांना सांगण्यात आले.नफा मिळेल, या आशेने माजी सैनिकाने त्याच्या बँक खात्यातून डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात वेळोवेळी ३० लाख ९० हजार रुपये लिंकवर दिलेल्या खात्यावर ट्रान्स्फर केले. परंतु, तीन महिने उलटूनही परतावा मिळाला नाही.त्यामुळे त्यांनी लिंकवर दिलेल्या नंबरवर फोन केला असता, त्यांना एकूण रकमेच्या २० टक्के टॅक्सची रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगण्यात आले. त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही टॅक्सची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम परत करा, अशी
मागणी माजी सैनिकाने केली.त्यानंतरही त्यांनी पैसे परत केले नाहीत.तुम्हाला टॅक्सची रक्कम भरावीच लागेल, त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे पलीकडून सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी पुन्हा १ लाख ८० हजार रुपये पाठवले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles