Friday, June 14, 2024

नगर अर्बन खातेदार व ठेवीदारांना बँकेच्या वतीने महत्त्वाचे अवहान

अहमदनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार व ठेवीदारांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम डी आय सी जी सी क्लेमच्या माध्यमातून परत मिळवण्यासाठी आपापली केवायसी कागदपत्रे बँकेकडे जमा करणेबाबत यापूर्वी बँक प्रशासनाने अनेकदा आवाहन करून देखील अद्याप अनेक ठेवीदार व खातेदारांनी आपले केवायसी कागदपत्रे बँकेकडे जमा न केल्यामुळे संबंधितांना रकमा परत करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सर्व ठेवीदार व खातेदारांना पुन्हा आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापली केवायसी कागदपत्रे व क्लेम फॉर्म बँकेच्या नजीकच्या शाखेत अथवा मुख्यालयात १८ जून २०२४ पर्यंत जमा करावेत.

सदर कागदपत्रे मुदतीत जमा न केल्यास खात्यातील रकमेचा दावा घेण्यास संबंधित खातेदार इच्छुक नसल्याचे व भविष्यात त्यावर दावा करणार नसल्याचे समजण्यात येईल. त्याच बरोबर बँकेच्या सर्व थकीत कर्जदार व जामीनदारांनी देखील आपापल्या कर्ज खात्यावरील थकबाकी रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे व संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles