Thursday, September 19, 2024

अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून हात-पाय बांधले, नगर तालुक्यातील एका विद्यालयातील घटना

नगर तालुक्यातील एका गावातील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून, हात- पाय बांधून तिचे अपनयन केल्याची घटना सोमवारी (5 ऑगस्ट) सायंकाळी घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय 13) काल, मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) (अपनयन) व 127 (2) (अटकाव करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. ती सोमवारी विद्यालयात होती. सायंकाळी साडेचारच्या दरम्यान ती विद्यालयातीलच शौचालयाकडे जात असताना अज्ञात व्यक्ती तेथे आला व त्याने मुलीचे तोंड दाबले.

तेथून तिला विद्यालयाच्या गच्चीवर नेले. हात, पाय व तोंड बांधून तिला तेथून जाण्यास अटकाव केला. तिचे अपनयन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरचा प्रकार विद्यालय सुटल्यानंतर साडेपाचच्या सुमारास लक्षात आला. विद्यालयात ग्रामस्थांनी गर्दी केली. मुलीची सुटका केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मुलीला पोलीस ठाण्यात आणून तिच्या सांगण्यावरून फिर्याद नोंदवून घेण्यात आली. दरम्यान, सदरचा मुलगा कोण होता. त्याने मुलीसोबत का असे केले याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोढे करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles