अहमदनगर नेवासा : नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथील पोलिस पाटील अशोक पुंड याने मद्यसेवन केलेल्या अवस्थेत गावातील एका जणाला लोखंडी
हत्याराने वार करत जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.६) रात्री आठच्या सुमारास घडली. जळके बुद्रुक (ता. नेवासा) येथील
बळीराम दत्तात्रय नाईक (वय ५०) हे शनिवारी रात्री आठच्या सुमारास गावातील लक्ष्मी मंदिराजवळ बसलेले होते, पोलिस पाटील अशोक पुंड हामद्यधुंद अवस्थेत तेथे आला. नाईक यांना विनाकारण शिवीगाळ करू लागला.नाईक हे तिथून निघून गेले. दरम्यान, पावणेनऊच्या सुमारास बळीराम नाईक व त्यांची पत्नी घराबाहेर असताना पुंड हा दुचाकीवर तेथे आला. बळीराम नाईक यांना मारहाण करू लागला. यावेळी हातातील लोखंडी हत्यार नाईक यांच्या
डोक्यात मारून त्यांना जखमी केले. नाईक यांच्या पत्नीलाही पुंड याने मारहाण केली.
दरम्यान, आरडाओरड झाल्याने शेजारील शुभम नाईक व विजय नाईक हे घटनास्थळी आले. पुंड यास बाजूल केले.जखमी बळीराम दत्तात्रय नाईक यांच्यावर नेवासा फाटा येथील एक खासगी दवाखान्यात औषधोपचार सुरु आहेत. या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात पोलिस पाटील अशोक पुंड
याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल आहे.
पोलिस पाटलाचे
मद्य प्राशन…घटनेची माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलिस पथक घटनास्थळी पाठविले. त्यावेळी पोलिस पाटील अशोक पुंड हा मद्य प्राशन केलेल्या स्थितीत आढळून आला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे करीत आहेत.