नगर – नगर शहराजवळील दरेवाडी येथील बांधकाम व्यावसायिकाला दोघांनी लाथाबुक्क्यांनी दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.११) रात्री ८.३० च्या सुमारास नगर – सोलापूर रोडवर असलेल्या मुठ्ठी चौकाजवळ घडली. गणेश राजु चव्हाण (रा. हरिकृष्ण नगर, दरेवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
याबाबत चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी (दि.१२) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक रामदास बेरड, प्रवीण सुरेश बेरड ( दोघे रा. दरेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी चव्हाण यांनी या दोघा आरोपींना बांधकाम साहित्य भाडे तत्वावर दिलेले होते. मात्र त्यांनी बरेच दिवस पैसे दिले नाही. त्यामुळे त्यांनी या दोघांना पैसे घेवून बोलावले असता त्याचा राग येवून त्या दोघांनी चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याबाबत चव्हाण यांच्या फिर्यादी वरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिकाला दोघांकडून बेदम मारहाण , नगर तालुक्यातील घटना
- Advertisement -