नगर – घरात विषारी औषध घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील नेप्ती शिवारात घडली. नितीन रंगनाथ ठुबे (वय ४०, रा. नेप्ती) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितीन रंगनाथ ठुबे यांनी शनिवारी (दि. ३) दुपारी त्यांच्या राहत्या घरी विषारी औषध घेतले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची आई लहानुबाई रंगनाथ ठुबे यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी (दि.४) दोनच्या सुमारास मृत्यू झाला.
याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी जिल्हा रूग्णालयात ड्यूटीवर असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जठार यांना दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नितीन यांनी कोणत्या कारणातून विषारी औषधाचे सेवन केले याची माहिती समजू शकली नाही. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार रेपाळे करत आहेत.