अहिल्यानगर शहरामध्ये जबरी चोरीच्या 3 गुन्हयांत पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई.
मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपीतांचा शोध घेऊन कारवाई आदेश दिले होते.
पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमून अभिलेखावरील फरार व पाहिजे आरोपीतांचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
दिनांक 09/12/2024 रोजी गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर शहरामध्ये फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 1799/2023 या गुन्हयातील पाहिजे आरोपी अक्षय धनवे, रा.प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर हा त्याचे राहते घरी येणार आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे राहते घरी जाऊन पडताळणी करून, तो राहते घरासमोर मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय बाबुराव धनवे, वय 32, रा.प्रेमदान हाडको, सावेडी, अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती घेऊन, पडताळणी केली असता तो खालील नमूद 3 जबरी चोरीच्या गुन्हयांमध्ये पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे.